आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. २
सौर मोहिमेतील आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी अशी कामगिरी केली आहे.
‘इस्रो’ चंद्रावर पोहोचली, अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच – हिंदु जनजागृती समितीची टीका
यासाठी इस्त्रो या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुर्याच्या संशोधनातील भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे.
या मोहिमेत पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन
तर यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारताने आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
इस्रोच्या अध्यक्षांचा बेंगलुरु येथे माध्यमांशी संवाद
भारताच्या अवकाश संशोधनाच्या गौरवशाली वाटचालीत योगदान देणारे आजी-माजी वैज्ञानिक, तंत्रज्ञ अभियंता, अधिकारी-कर्मचारी तसेच भारतीय नागरिकांचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिनंदन केले आहे.
——-