मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २
“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
इंडिया आघाडी’वरुन जनतेचे लक्ष वळविण्यासाठी जालन्यात लाठीमार- नाना पटोले – उद्यापासून जनसंवाद यात्रा
या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
अशा घटना थांबविण्यासाठी मराठा आंदोलक नेते, कार्यकर्ते यांनी तसेच राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
——