इंडिया आघाडी’वरुन जनतेचे लक्ष वळविण्यासाठी जालन्यात लाठीमार- नाना पटोले – उद्यापासून जनसंवाद यात्रा
मुंबई, दि. २ सप्टेंबर
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उदघाटन
पटोले आज मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला.हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाल्याचे पटोले म्हणाले.
इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीत बोधचिन्हाचे अनावरण
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने उद्या दिनांक ३ सप्टेंबरपासून राज्यभर जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. राज्यातील पाच विभागात एकाचवेळी ही जनसंवाद यात्रा निघणार आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली.
——