ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. आरवमुदन यांनी लिहिलेल्या, ‘इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे!’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित

गोष्ट ‘इस्रो’ची…

रोहन प्रकाशनतर्फे ‘इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे!’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. आरवमुदन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. भारताची चांद्रयान मोहिम असो की मंगळयान मोहिम असो. या सर्वांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे अर्थातच ‘इस्रो’चे महत्वाचे योगदान आहे.

१९६० च्या दशकात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘इस्रो’ स्थापनेपासून ते आत्तापर्यंतचा इतिहास या पुस्तकातून उलगडण्यात आला आहे. डॉ. विक्रम साराभाई यांनी काही तरुण अभियंते आणि शास्त्रज्ञांना एकत्र आणून यान उभारणी केंद्र (रॉकेट लॉन्चिंग सेंटर) उभे करण्याचे स्वप्न पाहिले. सर्वांच्या मदतीने आणि मेहनतीने डॉ. विक्रम साराभाई
या द्रष्ट्या शास्त्रज्ञाचे हे स्वप्न अखेर ‘इस्रो’च्या रूपाने साकारले.

डॉ. विक्रम साराभाई यांनी तरुण वैज्ञानिकांच्या निवडलेल्या चमूत मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आर. आरवमुदनही होते. ‘इस्रो’ ही संस्था कशी घडत गेली, ‘इस्रो’चे विविध प्रकल्प, यातील सहभागी शास्त्रज्ञ, त्यांची जिद्द, मेहनत याविषयी आरवमुदन यांनी या पुस्तकात माहिती दिली आहे. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे ‘इस्त्रो’ संस्थेचा इतिहास असून विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.

हे पुस्तक रोहन प्रकाशनाच्या
https://rohanprakashan.com/
या संकेतस्थळावरून वाचकांना मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published.