Skip to content
मुंबई दि.२६ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अप आणि डाऊन जलद / अर्ध जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल / एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळविण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादरला येणाऱ्या अप मेल / एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे / विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर (तुर्भे आणि नेरूळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा, पनवेल – ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा, नेरूळ – ठाणे लोकल सेवा, नेरूळ – खारकोपर लोकल सेवा बंद असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असणार आहे.