Skip to content
मुंबई दि.२६ :- मुंबईकर नागरिकांनी मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२३पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे.
महापालिकेच्या २४ प्रभागांमध्ये प्रत्येक सहाय्यक अभियंत्यावर (जल विभाग) थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी आहे.
पाणीपट्टी न भरल्यास या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी जलजोडण्याही खंडित करण्यात येतात, जलजोडणीधारकांना प्रत्यक्ष भेटूनही वसुली केली जाते. मात्र तरीही गेल्या सात वर्षांत ही थकबाकी ९७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.