Skip to content
मुंबई दि.२४ :- येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत देशातील विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार असून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत या नियोजित बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.
विरोधकांच्या आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे, तर दुसरी बंगळूरु येथे आयोजित करण्यात आली होती. पुढील तिसरी बैठक मुंबईत सांताक्रुझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. देशातील२६ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.