Skip to content
ठाणे दि.२३ :- घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी सकाळी एक अवजड वाहन बंद पडल्याने गायमुख ते भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. गायमुख ते भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतूक करत होते.
त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या २० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे गुजरात, वसई, भाईंदर भागातून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला.