Skip to content
मुंबई दि.२३ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील तांत्रिक कामामुळे ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा उद्या (२४ ऑगस्ट) सकाळी १०.०० ते शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ‘एम पूर्व’ विभागात रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजी नगर रोड क्रमांक ०१ ते ०६, बैंगणवाडी रोड क्रमांक ०७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मनपा कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्ता नगर, बालाजी मंदिर रोड, एस. पी. पी. एल. इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस .डी. मार्ग जवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बी. ए. आर. सी. नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाळा गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी. वसाहत, गौतम नगर, पांजरपोळ या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तर ‘एम पश्चिम’ विभागात पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, हेमू कलाणी मार्ग, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी रोड, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौक, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर – या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.