मुंबई दि.२३ :- बृहन्मुंबई महारपालिकेच्या अखत्यारीतील बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येणारा अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येत्या ५ सप्टेंबरपासून सभासदांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
पाणी शुद्धीकरण यंत्रणा, संतुलन टाकी आणि अन्य काही अभियांत्रिकीय दुरुस्ती कामांसाठी तलाव बंद करण्यात आला होता. येथील दोन्ही तलावांची अभियांत्रिकीय कामे आणि संबंधित चाचण्या आता अंतिम टप्प्यात आहेत.