Skip to content
मुंबई दि.२१ :-डॉ. दाभोळकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषितपणा ठेवून एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. हा तपास पूर्णपणे भरकटलेला असून त्याला दाभोळकर कुटुंबीय आणि तत्कालीन नेतेच जबाबदार आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले.सनातन संस्थेच्या वतीने ‘तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन संवादात ते बोलत होते.
‘दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. सनातनच्या सातशेहून अधिक साधकांची पोलीस चौकशी करण्यात आली. मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. तपासाला प्रारंभ होण्यापूर्वीच ‘आरोपी कोण’ हे प्रथम निश्चित करण्यात आले आणि त्या दृष्टीने तपास करून खोटे-नाटे पुरावे गोळा करण्यात आले. त्यात पुढे दोनवेळा आरोपी आणि साक्षीदार बदलण्यात आले, असेही राजहंस यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर यांचा ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट’ लोकांना माहित आहे; पण त्यांचा ‘परिवर्तन’ नावाचाही ट्रस्ट आहे, ज्यात त्यांच्या परिवारातील बहुतांश सदस्य आहेत. काश्मिरला भारताचा भाग न दाखवणार्या ‘स्वीस एड फाउंडेशन’ या विदेशी संघटनेकडून या ‘परिवर्तन ट्रस्ट’ला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली कोट्यवधीच्या देणग्या येत होत्या. वृत्तपत्र चालविणार्या संस्थेला विदेशांतून देणग्या घेता येत नाहीत, असा कायदा असूनही ते विदेशी देणग्या घेत होते. या संदर्भात तक्रारी केल्यावर डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टचा ‘एफ.सी.आर्.ए.’ परवाना सरकारने रद्द केला, अशी माहितीही राजहंस यांनी दिली.