Skip to content
डोंबिवली दि.२१ :- टिळक नगर विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा अमृत पुत्र गौरव समारंभ नुकताच पार पडला. न्यूरोसर्जन व टिळक नगर विद्यामंदिरचे माजी गुणवंत विद्यार्थी डॉ. उज्वल येवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी होते.
गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ वैद्यक किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच करिअर न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम व्यवसाय संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. येवले यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष पावगी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पालकांना कायम ठेवीसाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून येवले कुटुंबीयांनी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
कार्यक्रमात पाचवी ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुस्तके आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यकारी मंडळाच्या सदस्या नितेश्री काबाडी यांनी प्रास्ताविक तर मुख्याध्यापिका चंद्रमोरे यांनी अहवाल वाचन केले. मृणाल जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्रद्धा जोशी यांनी केले.