डोंबिवली दि.२१ :- विवेकानंद सेवा मंडळतर्फे ‘हरित डोंबिवली’ प्रकल्पांतर्गत २५० वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम हाती घेण्यात आला असून उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात संकल्प बहुउद्देशीय संस्था, कोळेगाव, निळजे येथे ६० स्वदेशी वृक्ष लावण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग रोहिणी लोकरे, पाटबंधारे विभाग ठाणेचे अभियंता महेंद्र पाटील तसेच प्रगती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर, विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. लोकरे यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल काठे, अमेय कुलकर्णी यांनी केले.