मुंबई दि.२० :- हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ‘चंद्रभागा’ या उंच शिखरावर चढाई करण्यासाठी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमधील भारतीय मजदूर संघ महिला आघाडीच्या सरचिटणीस वर्षा शेळकंदे काल रवाना झाल्या.
भारतीय संरक्षण कामगार संघातर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, संघटनेचे गणेश टिंगरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शांताई लांडगे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.