ठळक बातम्या

शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करावे: राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.१९ :- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले. मुंबईतील व्हिला टेरेसा हायस्कूलचा वार्षिक दिवस तसेच पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन – उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा
विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन आदी जागतिक भाषा अवश्य शिकाव्यात परंतु त्यांना मातृभाषा तसेच राष्ट्रभाषेत बोलण्यास देखील सक्रिय प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.
सुजित पाटकर यांना २१ ऑगस्ट पर्यंत कोठडी
पर्यावरण रक्षण देशापुढील आव्हान असून युवा पिढीने पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा तसेच प्लास्टिकचा उपयोग कमी करून अधिक झाडे लावावीत, असेही राज्यपाल बैस म्हणाले. राज्यपालांनी सांगितले.  कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुसी शाह, सेंट टेरेसा हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर बबिता अब्राहम, सिस्टर संजीता कुजूर, प्रशासन अधिक्षिका सिस्टर लिमा रोज तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *