मुंबई दि.१८ :- करोना काळातील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुजित पाटकर याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत.
लाईफ लाईन रुग्णालयाच्या भागीदारांपैकी पाटकर हे एक आहेत त्यालाही करोना रुग्णालयाचे कंत्राट देण्यात आले होते. जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळा प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती.
करोना काळात महापालिकेने काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर पाटकर भागीदार असलेल्या कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.