मुंबई दि.१८ :- माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अभिवादन केले. यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार अनिल बाबर, आमदार संजय शिरसाट, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. दरम्यान, मंत्रालय प्रांगण येथेही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.