Skip to content
मुंबई दि.१८ :- ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली बैठक गुरुवारी झाली.
महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत समितीच्या सदस्यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध मुद्द्यांवर तब्बल पाच तास चर्चा केली.
समिती सदस्यांनी कळवा रुग्णालयामधील सामान्य कक्ष, अतिदक्षता विभागाचाही आढावा घेतला. येत्या काही दिवसांत समितीचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक बाबींचा खुलासा होणार आहे.