Skip to content
मुंबई दि.१५ :- कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने येत्या २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा कळवा रुग्णालयाला भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रुग्णालयात शेकडो रुग्णांवर नियमितरीत्या उपचार केले जातात. या घटनेमुळे येथील डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नका.
विरोधकांनी या घटनेचे राजकारण करण्याऐवजी काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना कराव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. कळवा रूग्णालयात विविध अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मनोरुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात १०० अतिरिक्त रुग्णशय्या उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.