आलाप आणि लहजा आर्ट फाऊंडेशनतर्फे आला आषाढ श्रावण कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली दि.०९ :- आलाप आणि लहजा आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ ऑगस्ट रोजी आला आषाढ श्रावण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पाऊस गाण्यांवर आणि कजरी, मल्हार बंदिश अशा गीत प्रकारांवर नृत्याविष्कार सादर होणार आहे.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन मकरंद वैशंपायन तर नृत्य दिग्दर्शन शीतल कपोले दांडेकर यांचे आहे. सौरभ सोहनी निवेदन करणार आहेत तर लहजाच्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम शास्त्री हॉल, विठ्ठल मंदिर रस्ता, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.