ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते हरी नरके यांचे निधन
मुंबई दि.०९ :- ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
नरके यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आलाप आणि लहजा आर्ट फाऊंडेशनतर्फे आला आषाढ श्रावण कार्यक्रमाचे आयोजन
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.