बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई दि.०८ :- बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बेस्ट कंत्राटी कर्मचारी यांच्यात झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’ला सुवर्ण पदक
बेस्टच्या सर्व आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे संप मागे घेत असल्याची घोषणा केली. दिवाळी बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वाढ इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. येण्या जाण्याचा पास मोफत दिला जाणार असून आंदोलन केले म्हणून कारवाई केली जाणार नाही,असे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत ठरविण्यात आले. त्यामुळे बेस्ट कंत्राटी कामगारांनी संप मागे घेतला.