बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’ला सुवर्ण पदक
मुंबई दि.०८ :- मुंबईतील कचऱ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’ला बृहन्मुंबई महापालिकेला गोवा येथे आयोजित ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक कॉन्क्लेव्हमध्ये सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. ३७० संस्थांना मागे सारून मुंबई महापालिकेने बाजी मारली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सुविधांसाठी निर्माण केलेल्या यंत्रणेकरिता महानगरपालिकेला हा सन्मान देण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
शासकीय यंत्रणेत तंत्रज्ञानाशी निगडित सुविधा देणाऱ्या संथांना ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक अवॉर्डने सन्मानित करण्यात येते. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, नावीन्यपूर्णता, नागरिकांचा प्रतिसाद आदी निकषांच्या आधारे महापालिकेने सुवर्ण पदकावर नाव कोरले. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे सहाय्यक अभियंता डेनिस फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल – लोकल वाहतूक मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते आणि अंतर्गत भागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला सहज, सोपी व जलद यंत्रणा विकसित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेने मुंबईतील तक्रारींच्या निवारणासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन विकसित केली.