जे लोक आपला पक्ष सोडून गेले त्यांचे आणि आपले संबंध तुटले – उद्धव ठाकरे
मुंबई दि.२९ :- जे लोक आपला पक्ष सोडून गेले त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. त्यांनी आता पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावे लागेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेला दिला.
मुंबईतील शतकवीर रक्तदात्यांचा बृहन्मुंबई महापालिकेकडून गौरव
‘मातोश्री’ या निवासस्थानी शीव मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण आले आहे. ते उधाण रागाचे, त्वेषाचे, जिद्दीचे आहे. जे गेलेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’, असेही ठाकरे यांनी सांगितले.