रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.२९ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील.
जे लोक आपला पक्ष सोडून गेले त्यांचे आणि आपले संबंध तुटले – उद्धव ठाकरे
सकाळी ९.५० ची वसई रोड ते दिवा मेमू कोपपर्यंत चालविण्यात येणार आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता, सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ वाजेपर्यंत मेगब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबईतील शतकवीर रक्तदात्यांचा बृहन्मुंबई महापालिकेकडून गौरव
परिणामी पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि बेलापूरला जाणा-या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.