संघटित आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्ष करणार – भारतीय मजदूर संघाचा निर्धार
पुणे दि.२७ :- संघटित आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करेल, असे प्रतिपादन भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय मेनकुदळे यांनी येथे केले. भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे झालेल्या जिल्हा कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
मुलुंड येथे शनिवारी रानभाज्या, कडधान्य आणि तृणधान्य (मिलेट) महोत्सव
भारतीय मजदूर संघाच्या विश्वकर्मा भवन, शनिवार पेठ, पुणे येथील नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटनही यावेळी जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब फडणवीस, माजी महामंत्री उदय पटवर्धन, जेष्ठ मार्गदर्शक मुकुंद गोरे, भारतीय मजदूर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांच्या हस्ते झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरपरिस्थितीचा आढावा अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या ‘कामगार संदेश’ या डिजिटल मासिकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रास्ताविक तर जिल्हा सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी कार्यअहवाल वाचन केले. पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी आभार मानले.