सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर
अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची माहिती
मुंबई दि.२७ :- केंद्र सरकारच्या सुचनेनुसार व संयुक्त राष्ट्र संघ ‘युनिसेफ’च्या सहकार्याने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी ‘सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यात सर्व संभाव्य आपत्ती आणि सर्व संबंधित यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
संघटित आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्ष करणार – भारतीय मजदूर संघाचा निर्धार
बृहन्मुंबई महापालिकेच्या परळ येथील शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात आयोजित एका विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिसेफचे प्रतिनिधी युसुफ कबीर, चिन्मयी हेमानी, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. महेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले.
