महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप पूर्णतः तथ्यहीन- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि.२२ :- आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाली नसून, व्यवस्थेत कुठेही कमतरता नव्हती. ऊष्माघात होवून झालेला श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाला. सरकारी यंत्रणा आणि श्री सदस्य यांच्यात व्यवस्थेबाबत उत्तम समन्वय होता, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केले.
जखम असताना पावसाच्या पाण्यातून, चिखलातून चालल्यास ‘लेप्टो’ होण्याची शक्यता अधिक
कॉंग्रेसचे भाई जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते. राज्याच्या सर्व यंत्रणांसह आपत्कालीन विभाग, हवामान विभाग यांच्या सूचना, उपाय यानुसार व्यवस्था होती; कुणासाठी म्हणून सकाळी दहाची वेळ ठरली नव्हती तर श्री सदस्यांच्या सोयीने आणि व्यवस्थेला अनुकूल अशी वेळ निश्चित केली होती, त्यामुळे यासंदर्भात विनाकारण राजकारण आणून फक्त आरोप करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास ‘व्हॉट्सॲप’ वर तक्रार करता येणार
यापूर्वी राज्यांत घडलेल्या अश्या घटनांचा दाखला देत मुनगंटीवार यांनी चौकशी समितीला मुदतवाढ देण्याचे मुद्यांचे समर्थन केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळातील दुर्घटनांमध्ये झालेले मृत्यू, त्यानंतर तत्कालीन मंत्र्यांची भाषणे आणि तत्कालीन विरोधी पक्षाची भूमिका याचा पुराव्यासह मुनगंटीवार यांनी लेखाजोखा मांडायला सुरुवात केली तेव्हा विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
