ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास ‘व्हॉट्सॲप’ वर तक्रार करता येणार
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे आवाहन
मुंबई दि.२२ :- शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केले तर 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी ही माहिती दिली.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश, छायाचित्र किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
कृषी योजनांचा निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करा – राज्यपाल रमेश बैस
तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.
