मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.२२ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन दिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
कृषी योजनांचा निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करा – राज्यपाल रमेश बैस
परिणामी पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि बेलापूर कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. पनवेल येथून सुटणाऱ्या आणि ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवाही रद्द करण्यात आली आहे.
