माधवराव गाडगीळ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी का झाली नाही?- नाना पटोले
मुंबई, दि. २०
डॉ. मनमोहन सिंह सरकार असताना पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी माधवराव गाडगीळ समिती स्थापन केली होती. गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालाची आजपर्यंत अंमलबजावणी का झाली नाही?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सरकार तज्ञांची समिती स्थापन करते, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. इरशाळवाडी सारख्या घटनांमधून आपण काही बोध घेतला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे, असेही पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी दुर्घटना स्थळाला भेट देऊन माहिती घेतली व मदत कार्याची पाहणीही केली.
दरम्यान सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का? समृद्धी महामार्गावर अपघात होऊन २६ लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून राजभवनवर थाटात शपथविधी सोहळा करत होते आणि आता इरशाळवाडी येथे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना उपमुख्यमंत्री वाढदिवसाच्या पार्ट्या करत आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली.
—–
