देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी फलक आणि जाहिराती नको – भाजपचे आवाहन
मुंबई, दि. १८
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी (२२ जुलै) पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी होर्डिंग, बॅनर लावू नयेत आणि वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीवरून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.
याचे उल्लंघन झाल्यास पक्षातर्फे गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.
——
