विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू – चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई, दि. १६
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून ( सोमवार) सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर विधिमंडळाचे होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे- जयंत पाटील
चहापानाच्या या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलासह खातेवाटप जाहीर – विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थमंत्रीपद
—–
