राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे- जयंत पाटील
मुंबई, दि. १६
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली. त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाबाबत योग्य निर्णय होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
——
