राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि १६
राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
अमरावती येथील ‘पीएम मित्रा पार्क’ चे अनावरण हॉटेल ग्रॅण्ड हयात, कलिना येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू – चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, जमीन, पाणी, ऊर्जा, दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत आहेत. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना विभागातर्फे चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे- जयंत पाटील
महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी ‘पीएम मित्रा’ अंतर्गत (मेगो इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन ॲण्ड ॲपेरल) मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार आहे. यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण !
महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून जलद गतीने पायाभूत सुविधा वाढत आहेत. किनारा मार्गाचे काम सुरू आहे. ट्रान्स हार्बर लिंक अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग तसेच इतर दळणवळणाच्या सुविधा राज्यात उपलब्ध होत आहेत.
कडोंमपाची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी या ‘पीएम मित्रा’ पार्क च्या उभारणीला मंजुरी दिली आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
——–
