मुंबईतील कापड गिरणी संग्रहालयाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण
मुंबई दि.१४ :- भायखळ्यातील काळा चौकी येथे दी इंडिया युनायटेड मिल क्रमांक-२ आणि ३च्या जागेवर कापड गिरणी संग्रहालय उभारण्यात येत आहे. संग्रहालयाचा पहिला टप्पा येत्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रीमियम वातानुकूलित बससेवेमुळे ‘बेस्ट’ला तीन कोटी रुपयांचे उत्पन्न
मुंबईतील गिरण्यांचा इतिहास या कापड गिरणी संग्रहालयातून उलगडणार आहे. पहिल्या टप्प्यातील सात हजार चौरस मीटर जागेवरील ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे संग्रहालय दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे.
