Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

ठाणे महापालिकेतर्फे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

ठाणे, दि. ११
जागतिक छायाचित्र दिनाच्यानिमित्ताने ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘न्युज फोटोग्राॅफी’, ‘लँडस्केप’, ‘डेली लाईफ’, राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ‘स्मार्ट सिटी’, ‘एरीयल फोटोग्राॅफी’, ‘फेस्टीवल’, तर, जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ‘ मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे ’ असे विषय देण्यात आले आहेत.

स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेबद्दल अधिक माहिती http://www.tsdps.in या संकेतस्थळार उपलब्ध आहे.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १८ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत ठाण्यातील तीन हात नाका येथील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *