धर्म संस्कृती

सनातन संस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यात ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन

ठाणे, दि. १
सनातन संस्थेतर्फे येत्या ३ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात श्री व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), साधनेविषयी लघुपट, समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.

तसेच धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

आई माताजी मंदिर सभागृह, आई माताजी चौक, वीर सावरकर नगर,वर्तकनगर, ठाणे (प.), साईप्रसाद हॉल ,अभय टॉवर, मयुरेश सोसायटीजवळ, शिवाजी महाराज चौकाच्या पुढे, बदलापूर (पू.), केळकर सभागृह, योगायोग सोसायटी, चंद्रात्रे क्लासेसच्या मागे, वडवली विभाग, अंबरनाथ (पू.), राघवेंद्र स्वामी मठ, पहिला मजला, कोपर रोड , अंबा माता मंदिरासमोर, डोंबिवली (प.), शुभमंगल कार्यालय, ‘बाटा शो-रूम’च्या वर, भाजी मार्केट, रेल्वे स्थानकाजवळ, डोंबिवली (पू.), आदर्श पब्लिक हायस्कूल 155/156, साईबाबा मंदिराच्या मागे, लोढा हेवन, निळजे, पलावा सिटी, डोंबिवली (पू.) या ठिकाणी कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी सहा अशी आहे.
राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *