साहित्य

शतक महोत्सवी नाट्य संमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात

मुंबई, दि. १
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे हे शतक महोत्सवी संमेलन असणार आहे. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने विभागीय पातळीवर विविध कार्यक्रमांचे तर मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.

राज्यभरात ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार;

या बैठकीस नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त उदय सामंत, शशी प्रभू, गिरीश गांधी, अशोक हांडे, मोहन जोशी आणि राज्यभरातील नियमक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
—-