शैक्षणिक

विविध शासकीय दाखल्यांसाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढ

मुंबई, दि. १
राज्य शासनाच्या महाऑनलाईन या पोर्टलची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे सादर करण्यासाठीची मुदत येत्या १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

इयत्ता अकरावीतील प्रवेश, तसेच विविध कामांसाठी अधिवास, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांची गरज लागते.

मात्र राज्य शासनाचे महाऑनलाईन पोर्टल आणि सेतू सुविधा केंद्राच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था कोलमडली आहे. राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सर्व्हरमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *