ठळक बातम्या

राज्यभरात ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार;

२१० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार

मुंबई, दि. ३०
राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत सध्या १५५ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू असून आतापर्यंत ७ लाख ४३ हजार ५७० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरू केले जाणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचा विस्तार राज्यभरात करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.

या दवाखान्यांसाठी २१० कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.

या दवाखान्यांसाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी, औषधे, चाचण्या, संगणकीय सामुग्री, ५०० चौरस फूट जागा, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमधून ३० प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार असून दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी असणार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *