वाहतूक दळणवळण

बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

ठाणे, दि. २६
बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान अपमार्गावर आज सकाळी मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या एका मागोमाग एक अशा खोळंबल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि सकाळी ऐन कार्यालयीन वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

सोमवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान अप मार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. अप मार्गावरील लोकल आणि मेल एक्सप्रेस सेवांची वाहतूक कर्जत ते बदलापूरच्या दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक पर्यायी इंजिन बदलापूरकडे रवाना करण्यात आले. बंद पडलेले इंजिन दूर केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *