सागरी किनारा मार्गाचा खर्च २२६ कोटी रुपयांनी वाढला
मुंबई, दि. २६
वस्तूसागरी किनारा मार्गाचा खर्च २२६ कोटी रुपयांनी वाढला आणि सेवा करातील वाढीमुळे बृहन्मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाचा खर्च २२६ कोटी रुपयांनी वाढला आहे. आतापर्यंत कंत्राटदाराला ६५ टक्के रक्कम देण्यात आली आहे.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम तीन भागांमध्ये विभागले असून यातील प्रत्येक भागासाठी स्वतंत्र कंत्राटदार आहेत. या तीनही कंत्राटदारांच्या रकमेत वाढ झाली आहे. हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करण्यात येणार होता.
मात्र, प्रकल्प रखडल्यामुळे या वर्षांअखेरीस प्रकल्प पूर्ण होणार असून कंत्राटदारांना ३१ कोटींचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
—–
