स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल विजयी
सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय
मुंबई, दि. २६
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल विजय झाले आहे.
राज्यभरातील २८१ मतदान केंद्रांवर २३ जून रोजी निवडणूक पार पडली. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्वच्या सर्व म्हणजे १९ जागांवर विजय झाला आहे.
१९ जागा जिंकून एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनेलने धक्का दिला आहे.
—-
