Thursday, June 25, 2026
Latest:
अर्थ उद्योग

दोन हजार रुपयांच्या २.४१ लाख कोटी रुपयांहून अधिक नोटा बँकांमध्ये जमा

मुंबई, दि. २६
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर एका महिन्यात ३.६२ लाख कोटी रुपयांपैकी दोन तृतीयांशपेक्षा अधिक (२.४१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत.‌

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय १९ मे रोजी घेण्यात आला. मार्च २०२३ पर्यंत एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या.

येत्या ३० सप्टेंबपर्यंत या नोटा बॅंकेत जमा करण्याचे किंवा त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आले आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *