शैक्षणिक

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई, दि. २६
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे उदघाटन आज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत झाले. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. या उदघाटन सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सामाजिक न्याय विभागाने उभारलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.‌हे वसतीगृह चेंबुर येथे उभारण्यात आले असून येथे २५० विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. खेडोपाडी शाळा सुरू केल्या.आणि वसतिगृह संकल्पना आणली त्यामुळे वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणून संबोधले जाते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

खासदार राहुल शेवाळे यांचेही भाषण यावेळी झाले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविक केले तर समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आभार मानले.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *