वाहतूक दळणवळण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु

पावसाळ्यात आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार
मुंबई, दि. २६
छत्रपती शिवाजी महाराज ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून (मंगळवार) सुरू होणार आहे. सध्या कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले असून वेगावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे सध्या तरी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार आहे.

पावसाळ्यात ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२३ वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचणार आहे.

तर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *