महापालिकेचे ठरले तर मग, कोणी, कोणते खड्डे बुजवायचे!
मुंबई, दि. २६
मुंबई आणि उपनगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे कोणी बुजवायचे? या कामाची विभागणी करण्यात आली असून बृहन्मुंबई महापालिका मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालय यांच्यातील समन्वयाने या रस्त्यांची विभागणी करण्यात आली आहे.
सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे प्रभाग कार्यालयाकडून तर त्याहून मोठ्या रस्त्यांवरील खड्डे मध्यवर्ती कार्यालयाकडून बुजविण्यात निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या वर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. यावर्षीही या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर कोल्डमिक्स वापरण्यात येणार असून त्याहून मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी रिॲक्टिव्ह अस्फाल्ट व रॅपिड हार्डनिंग काँक्रीट वापरण्यात येणार आहे.
दरम्यान रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने १८००२२१२९३ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिला आहे.
——-
