शैक्षणिक

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १२
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल आज सकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात १४ विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळविले आहेत.

पीसीएम गटातून ३ लाख १३ हजार ७३०, तर पीसीबी गटातून २ लाख ७७ हजार ४०० अशा एकूण ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. राज्य सीईटी सेलमार्फत ही परीक्षा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १९७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यापैकी १८१ केंद्रे ही महाराष्ट्रात आणि १६ केंद्रे ही महाराष्ट्राच्या बाहेर होती.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *