डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे निधन
डोंबिवली, दि. ११
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे रविवारी निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयात मुंदडा गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते. ग्रंथसंग्रहालयाचे प्रशासन, ग्रंथसंपदा नियोजन आणि अर्थकारण हे काम ते तळमळीने करत. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका, वाचनकक्षाच्या नुतनीकरणात त्यांचा मोलाचा वाटा होता. ग्रंथसेवेतील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना नागरी अभिवादन समितीतर्फे सन्मानित करण्यात आले होते.
